नागपूर ः ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी आज प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असल्याचे स्पष्ट केले. सध्या नागपूर शहरांमध्ये बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन व अन्य औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विरुद्धची लढाई सर्व मिळून सर्वांच्या सहकार्याने लढली जात आहे. पुढील काळातील नियोजनासाठी प्रयत्न केले जात असून दर चार तासांनी प्रत्येक बाबीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काळात ही लाट नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
#corona #maharashtra #nagpur
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics